
स्थानिक रहीवाशांनी केला मा. नगरसेविका रूपाली भगतसह जनसेवक गणेश भगतांचा सत्कार
नवी मुंबई : नेरुळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मधील सेक्टर १६ए मधील शिवनेरी व परिमल या दोन गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका रूपाली भगत आणि जनसेवक गणेश भगत यांच्या हस्ते झाला.
या सोसायटीत मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. अनेक राजकारण्यांनी त्यांना त्या त्या वेळी आश्वासनेच दिली. पण काम कोणी पूर्णत्वास नेले नाही. तत्कालीन नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे तर जनसेवक गणेश भगत यांनी लोकनेते गणेश नाईकांकडे पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावल्याचे समाधान आज उद्घाटनप्रसंगी स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत होते. यावेळी दोन्ही गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांनी मल:निस्सारण वाहिनी बदलण्याच्या कामास सुरूवात झाल्याबद्दल माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत व जनसेवक गणेश भगत यांचा सत्कार केला. यावेळी समाजसेवक संजय पाथरे, पांडुरंग बेलापुरकर, आर. एम. पाटील, दत्तात्रेय माने, निवृत्ती इंगवले, सुरेश धुरी, वेंकट जाधव, मनजीत सिंग, सय्यद सुलतान, नामदेव अवघडे, आर बी सिंग, चंद्रकांत देशमुख, सुधाकर सोनावणे, रविंद्र भगत यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.