स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त प्रभाग ८७ मध्ये शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे व माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचेआयोजन केले असून स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी व शिवसैनिकांच्या तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी परिश्रम करण्यात आले.
२३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानात विभागातील नागरिकांच्या हस्ते योगा प्लॅटफॉर्मचे भूमीपुजन करण्यात आले. यासाठी स्थानिक माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सांयकाळी शिवसेना शाखेत सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शिवसेना माजी नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी उत्साहात साजरा केला.
२४ जानेवारी रोजी शिवसेना शाखेतच रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. ४० बाटल्या रक्ताचे संकलन या कार्यक्रमात करण्यात आले. प्रभागातील ८० ज्येष्ठ नागरिकांना शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते एसटी कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, उपशहरप्रमुख गणेश घाग, गणपत शेलार, उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमांना उपस्थित होते.
२३ जानेवारी रोजी प्रभागात घरोघरी जावून दरवर्षीप्रमाणे हळदीकुंकु करण्याचा कार्यक्रम सौ. सुनिता रतन मांडवे यांनी सुरू केला. यंदाचे त्यांचे हे घरोघरी जावून हळदीकुंकु साजरा करण्याचे हे ११वे वर्ष आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, युवा सेनेचे विभाग अधिकारी विशाल गुंजाळ , महिला विभाग संघठक शलाका पांजरी, उपविभाग संघठक शुभांगी परब, शाखासंघठक जयश्री बेळे, उपशाखाप्रमुख अनुभव बेळे, प्रकाश वाघमारे, सुरेश मोरे, प्रकाश कारभार, शरद पाजंरी, शंकर पडवळ, गौतम शिरवळे, कुंभारकर, राजू प्रभु, शंकर परब यांच्यासह शिवसैनिकांनी आणि स्थानिक रहीवाशांनी परिश्रम घेतले.