स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मधील प्लॉट १५ वरील बी टाईपची ९६ सदनिका असलेली शिवम सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला.
या सोसायटीतील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात व सर्व रहीवाशांच्या सहभागाने पार पडला. ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाल्यावर सोसायटीमधील लव्हेकरकाका, उरसळ यांचे आई-वडील, चौगुले काका, सोसायटीच्या पदाधिकारी काकडे मॅडम यांच्या आई या पाच रहीवाशांचा कोरोना काळात कोरोना व अन्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे त्यांना सर्वप्रथम श्रध्दाजंली वाहण्यात आली. सोसायटीचे माजी अध्यक्ष दिगंबर गांवकर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले व त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोसायटीतील मुलांकडून यावेळी राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सोसायटीतील महिलांचा उत्साही सहभाग पहावयास मिळाला. स्वयंम खांडगेपाटील यांच्या ‘जब झिरो दिया मेरे भारत ने या देशभक्तीपर गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. सोसायटीचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मारूती बोरकर यांचे प्रेरणादायी भाषण झाले. सोसायटीच्या खजिनदार सुवर्णा खांडगेपाटील यांनी या कार्यक्रमात प्रास्ताविक, आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन अशा विविध भूमिका पार पाडल्या. सोसायटीतील धडाडीच्या उत्साही अशा विनी राजाध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून कोरोना काळातील सोसायटीतील घडामोडीचा आढावा घेतला. उत्साही वातावरणात सर्वाच्या सहभागाने शिवमचा प्रजासत्ताक दिन पार पडला. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे पदाधिकारी दिलिप ढेरे, गणपत सावर्डेकर, पुत्रन यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमास अत्तार, सुजित शिंदे, नवनाथ उरसळ, खामकर, शेळके, विनायक भांगरे, सतीश लाड, सुहास घाडगे, नारायण घोलप, माकर्डे अण्णा, सुहास घारे, सौ. सुरेखा पवार, सौ. लव्हेकर, सौ. लाड श्री व सौ. राजाध्यक्ष, अभिमन्यू यांच्यासह सोसायटीतील रहीवाशी व लहान मुले आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.