नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील अविकसित भुखंडाचे भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी स्वखर्चाने सुशोभीकरण केले आहे. अविकसित भुखंडाची समस्या निकाली निघाल्याने स्थानिक रहीवाशांकडून माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांच्या कार्याची प्रशंसा केली जात आहे.
नेरूळ सेक्टर १६ ए, प्लॉट १२३ वरील अविकसित भुखंडाच्या सुशोभीकरणाबाबत स्थानिक रहीवाशांनी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्याकडे मागणी केली होती. हा निवासी परिसरातील भुखंड डेब्रिज व अन्य कारणामुळे अविकसित होता व त्यास बकालपणाही प्राप्त झाला होता. माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी तात्काळ रहीवाशांच्या मागणीला न्याय देताना भुखंडाच्या सुशोभीकरणाला सुरूवात केली. या अविकसित भुखंडावरील डेब्रिज हटविण्यात आले. जनसेवक गणेश भगत यांनी या भुखंडावर एक ट्रक लाल माती आणून टाकली. ही माती संपूर्ण भुखंडावर पांगविण्यात आली. अवघ्या ४८ तासातच या भुखंडाचा चेहरामोहरा बदली झाला असून डेब्रिजसह अविकसितपणाची व बकालपणाची समस्या संपुष्ठात आली. अजून एक दिवस या भुखंडावर सुशोभीकरणाचे काम होणार असून त्यानंतर हा भुखंड स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अविकसित भुखंडावरील डेब्रिज हटवून त्याचे सुशोभीकरण केल्याबाबत स्थानिक रहीवाशांकडून सौ. रूपाली किस्मत भगत आणि गणेश भगत यांचे आभार मानण्यात आले आहेत.