नवी मुंबई : प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंतर्गत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची लेखी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर तसेच शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ संपूर्ण व सेक्टर १० मधील काही गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. या प्रभागात ९५ टक्के गृहनिर्माण सोसायट्या या सिडको वसाहती आहेत. येथील रहीवाशी हे अल्प व अत्यल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील आहेत. या गृहनिर्माण सोसायट्या तीन दशकाहून अधिक काळ जुन्या आहेत. या सोसायट्या अंर्तगत मल:निस्सारण वाहिन्या, जल वाहिन्या नव्याने टाकणे तसेच पदपथ नव्याने बनविणे आवश्यक आहे. कंडोनिअम अंर्तगत या कामांना प्राधान्य देण्याचे संबधितांना निर्देश देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.