नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ७६ मधील इच्छूक उमेदवार व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालय उदघाटन व मोफत आरोग्य शिबिर हे दोन्ही कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडले.
भाजपचे पांडुरंग आमले यांनी सानपाडा सेक्टर ३ येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात विभागातील ३५० हून अधिक रहीवाशी सहभागी झाले होते. या आरोग्य शिबिरात नेत्र चिकित्सा, मोफत चष्मा वाटप,, मधुमेह तपासणी, इसीजी तपासणी रहीवाशांची करण्यात आली. १७० लोकांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले.
सांयकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व भाजपचे युवा नेते तसेच भाजपा जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते भाजपच्या सानपाडा सेक्टर ३ येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष दत्ता घंगाळे, जिल्हा उपाध्यक्ष आबा जगताप , महामंत्री विजय घाटे, राजेश रॉय, भाजपा मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप, देवनाथ म्हात्रे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, शेखर भोपी, सुनिला कुरकुटे, प्रभाग ७४ च्या भाजपच्या शैला पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी रामचंद्र घरत, निलेश म्हात्रे, दत्ता घंगाळे, श्रीमंत जगताप यांनी समयोचित भाषणे करताना पांडुरंग आमले यांच्या जनसेवेचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला मोर्चा सानपाडा अध्यक्षा आज्ञा गव्हाणे, उपाध्यक्षा निता आंग्रे, मंगल वाव्हळ, सुलोचना निंबाळकर, संचिता जोएल, प्रतिभा पवार, सौ. शारदा आमले, दिशा केणी, तन्वी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जयश्री दंडवते उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी मंडळातील व प्रभागातील पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेटे यांनी तर आभार श्रीमंत जगताप यांनी मानले. कार्यक्रमात प्रास्तविकपर भाषण करताना पांडुरंग आमले यांनी हे जनसंपर्क कार्यालय २४ तास जनतेसाठी सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगितले.