नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ मधील शांतीनिकेतन सोसायटीच्या बाजूला असलेल्या रिक्त भुखंडावर फुलपाखरू (बटर फ्लॉय) उद्यान बनविण्याची मागणी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि महापालिका नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ४ मध्ये महापालिका विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच शांतीनिकेतन सोसायटीच्या बाजूलाच एक रिक्त भुखंड आहे. हा भुखंड अविकसित आहे. आपण आमच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देवून या भुखंडावर स्वच्छता अभियान राबवित भुखंडाची सफाई करून दिली. तेथील बकालपणा हटविला याबाबत सर्वप्रथम पालिका प्रशासनाचे विद्या भांडेकर यांनी आभार मानले आहेत.
या भुखंडावर महापालिकेने उद्यान फुलपाखरू (बटर फ्लॉय )उद्यान विकसित करावे, जेणेकरून परिसरातील बकालपणा संपुष्ठात येवून त्या ठिकाणी सुशोभीकरण होईल. कोणी तेथे डेब्रिज व रॅबिटही टाकणार नाही. तसेच फुलपाखरू उद्यान बनविल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला व स्थानिक रहीवाशांनाही त्याचा फायदा होईल. तरी आपण या अविकसित भुखंडाची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी व त्या भुखंडाचे पर्यायाने परिसराने सुशोभिकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लवकरात लवकर फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.