शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा
नवी मुंबई : आपल्या पक्षावरील निष्ठा व प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत आदर्शवत उदाहरण म्हणजे शिवसेना उपनेते विजय नाहटा होय. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देवू केलेली उमेदवारी त्यांनी नाकारत युतीचा धर्म पाळला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विजय नाहटा यांच्या अभिष्टटचिंत सोहळ्यात बोलताना केला.
एक कार्यक्षम सनदी अधिकारी, कुशल राजकारणी व कुटुंबवत्सल माणूस असणाऱ्या नाहटा यांनी भविष्यकाळात यशाची उंच शिखरे पादाक्रांत करावीत अशा भावपूर्ण शुभेच्छा आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना दिल्या. शिवसेना, नवी मुंबई यांच्या वतीने मुंबई झोपडपट्टी सुधारणा मंडळाचे सभापती आणि पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा अभिष्टचिंतन सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यग्रहात मोठ्या उत्साहात रविवारी पार पडला. यावेळी आमंदार शिंदे बोलत होते .
या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे, नवी मुंबई मनपातील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे , राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संतोष शेट्टी, इंटक नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, हरिभाऊ म्हात्रे (माजी जिल्हाप्रमुख), प्रशांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा निरीक्षक), प्रकाश पाटील (उपजिल्हा प्रमुख) संतोष घोसाळकर (उपजिल्हा प्रमुख), किशोर पाटकर (माजी नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख), माजी नगरसेविका सलूजा सुतार, प्रवीण म्हात्रे (शहर प्रमुख), विजय माने (शहर प्रमुख) यासह शिवसेना माजी नगरसेवक, नगरसेविका, युवा सेना पदाधिकारी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विजय नाटा फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबईतील सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांना आर्थिक मदत म्हणून धनादेश वाटप करण्यात आले. आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपनेते विजय नाहटा यांनी आगामी महानगरपालिकेमध्ये आघाडीची सत्ता येणार असून महापौर महा विकास आघाडीचा होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील उपस्थितासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख प्रदीप बी. वाघमारे यांनी केले.