सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईमध्ये तीन मनसे शाखांचा उदघाटन सोहळा उत्साहात पार पडला
नवी मुंबई : नवी मुंबईत तीन शाखांचे उदघाटन मनसे नेते अमित राज ठाकरे, आमदार राजू पाटील आणि मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नवी मुंबईत अत्यंत वेगाने फोफावताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून बेलापूर, कोपर खैरणे, दिघा येथे मनसे शाखांचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
बेलापूर मधील फणसपाडा गावात मनसे उप विभाग अध्यक्ष श्याम कोळी, प्रिया प्रशांत कोळी आणि प्रशांत कोळी यांच्या पुढाकाराने सुरु केलेल्या शाखा उदघाटन प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. मान्यवरांना संविधानाची प्रतिकृती आणि पारंपरिक कोळी टोपी देऊन स्वागत केले. उपस्थित कोळी पुरुष, महिला यांचा उत्साह पाहून शर्मिला वहिनी ठाकरे यांनी दोन महिन्यानंतर विजयाचे पेढे खायला येऊ, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी नेरुळ(प.) मधील शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुनिल हुंडारे यांनी आपल्या समर्थकांसह मनसेत प्रवेश केला.
कोपरखैरणे, सेक्टर – ६ येथे ऍड. जयदीप माळे यांच्या शाखेचे उदघाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी पक्षात प्रवेश केला. मनसेच्या कार्यकर्त्यांवर एवढ्या केसेस आहेत की वकिलांची संख्या कितीही वाढली तरी ती कमी पडते, अशी मिश्किल टिपण्णी यावेळी शर्मिला वहिनी ठाकरे यांनी केली.
दिघा येथे शिवसेनेचे शाखा प्रमुख दत्ता कदम यांनी मनसेत प्रवेश केला आणि सोबत मनसेची शाखाही स्थापन केली. यावेळी शाखेचे उदघाटन अमित राज ठाकरे, आमदार राजू पाटील, मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, पालघर – ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मान्यवरांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. उपस्थितांची प्रचंड गर्दी बघून शर्मिला वहिनी ठाकरे यांनी पालिका निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
या तीन शाखा उदघाटन प्रसंगी रायगड मनसे जिल्हा अध्यक्ष उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले, सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, दिनेश पाटील, शरद दिघे, नितीन लष्कर, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका कामगार सेना शहरअध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार सेना शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहर अध्यक्ष सागर नाईकरे, विधी विभाग शहर अध्यक्ष निलेश बागडे, रायगड मनविसे जिल्हा अध्यक्ष अॅड . अक्षय काशीद , महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, दीपाली, शुभांगी बंदीचोडे, विद्यार्थी सेना उप शहरअध्यक्ष निखिल गावडे, प्रेम दुबे इतर पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.