नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८५च्या उच्चशिक्षित कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या माध्यमातून सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावात निर्माण झालेली विकासाची गंगा आजही थांबण्यात तयार नाही. सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील कै. कान्हा चाहु म्हात्रे, सारसोळे, सेक्टर ६ (रमेश म्हात्रे यांचे निवासस्थान) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ झाला.
मागील पावणे सहा वर्षाच्या कालावधीत प्रभाग ८५ मधील सारसोळे व कुकशेत गाव तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरात विविध नागरी समस्यांचे निवारण करताना नागरी सुविधांचा डोंगर सौ. सुजाता सुरज पाटील यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कालावधीत निर्माण केला. ११६ नगरसेवकांच्या सभागृहात (पाच स्विकृत धरून) विकासकामे करूनही प्रसिध्दीपासून चार हात जाणिवपूर्वक लांब राहणाऱ्या तसेच सोशल मिडिया न हाताळणाऱ्या सौ. सुजाता सुरज पाटील या एकमेव नगरसेविका आहेत. ज्या स्थानिक जनतेसाठी कामे करते, त्या जनतेला ही विकासकामे कोणामुळे झाली आहेत, हे माहिती असल्याने प्रसिध्दीसाठी का प्रयत्न करावेत ही कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांची विचारधारणा त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखविलेली आहे.
नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या नगरसेवक निधीमधुन कै. कान्हा चाहु म्हात्रे मार्ग सारसोळे, सेक्टर ६ ( रमेश म्हात्रे यांचे निवासस्थान) येथील लॅाकडाऊनमुळे राहीलेले रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले. नवी मुंबईत अन्यत्र निवडणूकांच्या धर्तीवर चमकेश प्रकारांना उधाण आलेले असताना नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील या आजही प्रसिध्दीपासून लांब राहत विकासकामांसाठी प्रयत्न करत असल्याचे पुन्हा एकवार नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना अनुभवयास मिळाले आहे.