नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये कबुतरे, कावळे मृत होत असल्याने भीतीचे मळभ दुर करण्यासाठी जनसामान्यांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१८, १८ए या परिसराचा समावेश होत आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरामध्ये कावळे व कबुतरे मृत पावण्याचे प्रमाण वाढीस लागले. कोरोनापर्व कमी झाले असले तरी विविध रोगांच्या चर्चांनी जनसामान्यांत आजही भीतीचे वातावरण वाढीस लागले आहे. या मृत कबुतरे व कावळ्यांमुळे जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण वाढीस लागले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून स्थानिक रहीवाशांमध्ये जनजागृती निर्माण होणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून मृत कबुतरे, कावळे याबाबतही जनसामान्यांना खुलासा होणे आवश्यक आहे. आपण या मृत कावळे व कबुतरांविषयी प्रभाग 96 मधील जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.