
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी ३ मार्च २०२१पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून २१ मार्च २०२१ पर्यत अर्ज भरण्याची मुदत आहे. शिक्षण संचालकांनी परिपत्रक प्रसिध्द करून याबाबतची माहिती दिली आहे.
काही दिवसापूर्वी नवी मुंबईतील अनेक राजकीय घटकांनी आरटीई प्रवेशाबाबत सोशल मिडियावर बॅनरबाजी करताना काही काळ जनतेची दिशाभूल केली व समाजात आपले हसे करून घेतले होते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. या जागावर आरटीईच्या माध्यमातून गरीबांच्या मुलांनाही चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यास मदत होत आहे.