संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडूनउपलब्ध करून दिल्या जाणारी लस नवी मुंबईकरांना मोफत देण्याची मागणी प्रभाग ८७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
राज्यात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्या कोरोना नियत्रंणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले कार्य उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच कोरोनाचा उद्रेक महापालिका प्रशासनाने नियत्रंणात आणला आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाची आकडेवारी हळहुळू वाढू लागली आहे. काल कोरोनाग्रस्तांचा आकडा १५१ वर गेला आहे. नवी मुंबई शहरात कोरोना पूर्णपणे संपुष्ठात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा एकवार कंबर कसली आहे. नवी मुंबईकरांना खासगी रूग्णालये व दवाखान्यात कोरोनावरील लस देण्याचे निश्चित केले आहे. ही लस अंदाजे २५० रूपयाला नवी मुंबईकरांना देण्यात येणार आहे. नवी मुंबई ही राज्यातील श्रीमंत महापालिकामध्ये मोडली जाणारी महापालिका आहे. स्वमालकीचे धरण या महापालिकेचे आहे. नवी मुंबईकरांच्या मालमत्ता कर तसेच अन्य माध्यमातून महापालिका प्रशासनाच्या तिजोरीत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना दिली जाणारी लस ही मोफत देणे आवश्यक आहे. लस ही पूर्णपणे नि:शुल्क असावी. त्यासाठी नवी मुंबईकरांवर कोणताही आर्थिक भुर्दंड लादला जावू नये ही आमची भूमिका आहे. महापालिका प्रशासनाच्या अडीच हजार कोटीच्या ठेवी आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मोफत लस देताना काही कोटी खर्च झाले तरी त्यावर कोणाही नवी मुंबईकराची हरकत नसणार. कोरोनामुळे प्रत्येक घराचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत असलेली कोरोना प्रतिबंधक लस नवी मुंबईकरांना पुर्णपणे मोफत द्यावी, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.