नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रिक्षा व्यवसायात येणार्या समस्यांविरोधात संघर्ष करत रिक्षा चालक मालकांना सुविधा देण्यासाठी कार्यरत असणार्या समाजसेवक दिलीप आमलेे यांनी नुकतेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या चालक-वाहकांचे व्यसनमुक्तीवर प्रबोधन केलेे असून त्यांच्या या कार्याबाबत परिवहन उपक्रमाकडून त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आलेे आहेे.
नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दिलीप आमलेे हेे अनेक वर्षे या क्षेत्रातील समस्या सोडवित आहेत. चालकांना असलेल्या व्यसनामुळेे वाढते अपघात आणि त्यामुळे त्या चालकासह समस्त घरालाच येणारे अपंगत्व या बाबी दिलीप आमलेे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वाहन चालकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करण्याचा उपक्रम सुरू केेला. ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यात त्यांनी हेे अभियान राबविताना असंख्य चालकांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त केलेे आहेे.
फेब्रुवारी महिन्यात 4 ते 10 फेब्रुवारीमध्ये महापालिका परिवहन उपक्रमामधील चालकांना दिलीप आमलेे यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधन करताना कार्यशाळा घेतली. यामध्ये दिलीप आमलेे यांनी चालकांना व्यसनाचे दुष्परिणाम आणि कुंटूबाची यामुळे होणारी वाताहत याबाबत मार्गदर्शन केलेे. यामुळे आपणाला व्यसनापासून परावृत्त होण्यास मदतच झाली असल्याची कबुली दिलीप आमलेे यांच्याजवळ अनेक चालकांनी दिली.
दिलीप आमलेे यांच्या कार्याची दखल घेत महापालिका परिवहन उपक्रमाने त्यामना प्रमाणपत्र देवून त्यांच्या व्यसनमुक्ती अभियानाचा गौरव केला आहेे.