संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कामगारांची वेतन विलंबामुळे होणारी ससेहोलपट आजही सुरूच आहे. मार्च महिन्याची ४ तारीख उलटली तरी मुषक नियत्रंण कामगारांच्या हातात अजुन जानेवारी २०२१ महिन्याचे वेतन पडलेले नाही. वेतनास विलंब होत असतानाही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने कामगार वर्गाकडून संतापाचा सूर आळविला जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेत कायम, ठोक तसेच कंत्राटी सर्वच कामगारांचे वेतन वेळेवर होत असतानाही केवळ मुषक नियत्रंण विभागाच्या कामगारांचेच वेतन दोन ते तीन कधीकधी चार महिने विलंबाने होत आहे. काही दिवसापूर्वीच सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे याप्रकरणी निवेदन देवून मुषक नियत्रंण कामगारांच्या वेतन विलंबाकडे लक्ष वेधले होते. भगत यांच्या पत्राची दखल घेत एक महिन्याचे वेतन तात्काळ या मुषक नियत्रंण कामगारांना देण्यात आले. परंतु पुन्हा तोच सावळागोंधळ सुरू राहील्याने आज पुन्हा एकवार मुषक नियत्रंण कामगारांचे वेतन रखडले आहे.