नवी मुंबई : महापालिका प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 मधील सनशाईन रूग्णालयात प्रथमच कोरोना लस घेणार्या वृध्द दांपत्याचा जनसेवक गणेश भगत यांच्या हस्ते शनिवारी दुपारी सत्कार करण्यात आला.
शनिवार, दि. 6 मार्च रोजी नेरूळ सेक्टर 16 मधील सनशाईन रूग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याच्या अभियानाचा शुभारंभ झाला. या रूग्णालयात विभागातील सीब्रीज या गृहनिर्माण सोसायटीतील कैलास शर्मा (वय वर्ष 78) आणि त्यांच्या पत्नी उमा शर्मा (वय वर्ष 71) यांनी सर्वप्रथम कोरोना लस घेतली. समाजात कोरोना लस बाबत अनेक समज-गैरसमज असताना शर्मा दांपत्यानेे लस घेवून एक आदर्श निर्माण केेल्याचे सांगत जनसेवक गणेश भगत सनशाईन रूग्णालयात जावून या ज्येष्ठ नागरिक असलेेल्या वयोवृध्द दांपत्याचा सत्कार केेला. यावेळी सीब्रिज सोसायटीचे अध्यक्ष सुमित अग्रवाल उपस्थित होते. शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर कोरोना लस घेवून शहर कोरोना मुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी जनसेवक गणेश भगत यांनी यावेळी केलेे.