• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 6, 2021

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी

adminbyadmin
in Uncategorized
0
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनातील कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट हा अतिशय महत्वाचा घटक असून त्याकडेही बारकाईने लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील शास्त्रोक्त लँडफील पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शहर अभियंता सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता मनोज पाटील उपस्थित होते.

महानगरपालिकेचा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा देशातील एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणून सुरूवातीपासूनच नावाजला जात असून अनेक देशी, परदेशी पर्यावरण तज्ज्ञांनी त्याला भेट देत प्रशंसा केलेली आहे. या प्रकल्पस्थळी दररोज ७५० मेट्रिक टनाहून अधिक ओला व सुका कचरा शहरातील विविध ठिकाणांहून आणला जातो व त्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाते.

या प्रकल्प स्थळावरील पाच सेल क्षमता संपुष्टात आल्याने शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्यात आले असून सध्या सहाव्या सेलची क्षमता संपुष्टात येत असल्याने सातवा सेल तयार करण्यात आलेला आहे. आयुक्तांनी या सर्व सेलची पाहणी करीत तांत्रिकदृष्टया माहिती जाणून घेतली व महत्वाच्या सूचना केल्या.

प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यापासून साधारणत: ३२ ते ३५ मेट्रिक टन सेंद्रीय खत तयार होत असून त्याचा उपयोग उद्यानांचे शहर म्हणून नावलौकिक असणाऱ्या महापालिका क्षेत्रातील उद्याने, बागा, पार्क फुलविण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे यामधील १८ ते २० मेट्रिक टन प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाते. यामधून प्लास्टिक ग्रॅन्युल्स बनवून डांबरी रस्ते तयार करताना त्यावर कोटींग म्हणून उपयोग केला जातो. यामुळे रस्त्यांमध्ये पाणी झिरपत नाही आणि डांबरी रस्त्यांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. घनकचऱ्यातील द्रव लिचेटवर प्रक्रिया करून त्याचा उपयोग प्रकल्पस्थळावरील हरितपट्टा आणि उद्यानासाठी केला जातो.

याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकाम कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २० मेट्रिक टन प्रति तास क्षमतेचा सी अँड डी प्रक्रिया प्रकल्प त्याठिकाणी कार्यान्वित आहे. यामध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेली खडी व रेती महानगरपालिकेच्या वतीन रस्ते, गटारे, पदपथ यांच्या बांधकामात वापरण्यात येते. त्याचप्रमाणे स्लजपासून पेव्हर ब्लॉक स्वरूपातील विटा तयार करण्यात येत असून त्याचाही उपयोग बांधकामाप्रसंगी होतो.

या प्रकल्पस्थळावरील सर्व यंत्रणेची त्या त्या जागी जाऊन पाहणी करीत आयुक्तांनी त्याठिकाणची स्वच्छता अधिक वाढविण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे भविष्यातील प्रकल्पस्थळाच्या नियोजनाविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना दिल्या.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचऱ्याचे संकलन, वाहतुक आणि शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट याची प्रणाली व्यवस्थित राबविली जात असली तरी त्यामध्ये अधिक सुधारणा करणेबाबत जागरूकतेने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

त्याचप्रमाणे नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खत टोपलीसारख्या उपयोगी गोष्टीचा वापर करून घरातील ओल्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट लावली तर त्यांना कुंडीतील झाडे फुलविण्यासाठी सेंद्रीय खतही मिळेल तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळ मिळून देशात पहिल्या नंबरचे शहर म्हणून आपण केलेला निश्चय पूर्ण होईल असा विश्वस व्यक्त करीत समस्त नवी मुंबईकर नागरिकांनी माझा कचरा ही माझी जबाबदारी मानत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत मौलिक योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. 

Previous Post

सनशाईन रूग्णालयात प्रथम कोरोना लस घेणार्‍या वृध्द दांपत्याचा गणेश भगत यांच्याकडून सत्कार

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त साईभक्त महिला फाऊंडेशनकडून लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

Next Post
आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

जागतिक महिला दिनानिमित्त साईभक्त महिला फाऊंडेशनकडून लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

एलआयजीतील नादुरूस्त पथदिव्यांची दुरूस्ती करा : विद्या भांडेकर

महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून महिलांसाठीचे आरोग्य चिकित्सा शिबिर उत्साहात

महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून महिलांसाठीचे आरोग्य चिकित्सा शिबिर उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com