नवी मुंबई : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महानगर पालिकेच्या वतीने प्रभाग क्र.७३ मधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरा नगर तुर्भे अंतर्गत पालिका शाळा क्र.२५ मध्ये कोरोना लसीकरण केंद्राचे शुभारंभ करण्यात आले आहे. या केंद्रात ८ मार्च १० मार्च आणि १२ मार्च पर्यंत लसिकरण करण्यात येणार आहे. यात ८ मार्च रोजी फक्त ४५ वर्षा पेक्षा जास्त वय किंवा ६० वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना ज्यांना गंभीर आजार आहेत अशा महिलांना तज्ञ डॉक्टरांकड़ून तपास करून सल्या नुसार प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. इंदिरा नगर मधील कोरोना लसीकरण केंद्रात प्रथम लस घेणाऱ्या ज्येष्ठ महिलाना प्रभाग क्र.७३ चे समाजसेवक अंकुश अमृत मेढकर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार तसेच प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले.या प्रसंगी समाजसेवक अंकुश मेढकर सोबत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरा नगर केंद्राच्या प्रमुख डॉ. मैथिली शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते.