नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग 76 मध्ये भाजपाचे कार्यकर्ते व समाजसेवक पांडुरंग आमले आणि साईभक्त महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेेलेे विविध सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रम उत्साहात पार पडलेे.
साईभक्त महिला फाऊंडेशन आणि समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून सानपाडा विभागातील कोरोना काळात काम करणार्या महिला परिचारिका, डॉक्टर, पोलीस, शिक्षक, व स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योध्दा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त यांचा जाहीर सत्कार करण्यात आला असल्याची माहिती साईभक्त महिला फांऊडेशनच्या संयोजिका सौ.शारदा पांडुरंग आमलेे यांनी दिली. या कार्यक्रमात 40 कोरोना योध्दा म्हणून महिलांचा सत्कार करण्यात आला. या महिलांनी यावेळी कोरोना काळातील आपलेे अनुभव कथन केले. या कार्यक्रमात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी मेणबत्ती प्रज्वलित करणे, फुगे फोडणे, अभिनय स्पर्धा, एकांकिका आदी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आलेे होेते. स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिसे देवून त्यांना गौरविण्यात यावेळी गौरविण्यात आलेे. कार्यक्रमात सहभागी झालेेल्या सर्व महिलांना साईभक्त महिला फांऊडेशनकडून तुळशीची रोपे भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमातील स्पर्धेत उत्कृष्ठ अभिनय करणार्या मंगल वाव्हळ यांना कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेेली मानाची पैठणी देवून गौरविण्यात आलेे असल्याची माहिती सौ. शारदा पांडुरंग आमलेे यांनी दिली. सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरातील रॉयल हॉटेलच्या बाजूला असलेल्या समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात या स्पर्धा पार पडल्या. महिला दिन साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी प्रभाग 76 मधील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आमलेे यांच्यासह साईभक्त महिला फांऊडेशनच्या सौ. शारदा आमलेे, आज्ञा गव्हाणे, मंगल वाव्हळ, दिशा केणी, सुलोचना निंबाळकर, निता आंग्रे, संचिता जोएल आदींनी परिश्रम घेतले.