नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजी अंर्तगत गृहनिर्माण सोसायटीतील नादुरूस्त पथदिव्याच्या दुरूस्तीबाबत काँग्रेसने नेरूळ विभाग अधिकारी कार्यालय व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केलेेल्या लेखी पाठपुराव्याला महापालिका प्रशासनाकडून काही तासातच सकारात्मक प्रतिसाद दिला गेल्याने एलआयजीतील पथदिव्यांची दुरूस्ती झाली आहे. एलआयजीतील अंधारावर काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळेच उजेडाने आता मात केली असल्याचे स्थानिक रहीवाशांकडून बोललेे जावू लागलेे आहे.
नेरूळ सेक्टर 2 मधील एलआयजी अंर्तगत गृहनिर्माण सोसायटीतील नादुरूस्त पथदिव्याची दुरूस्ती तसेच काही ठिकाणी नव्याने पथदिवे बसविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि महापालिका विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांच्याकडे लेखी निवेदनातून नुकतीच केली होती.
नेरूळ सेक्टर 2 मध्ये कष्टकरी श्रमिकांची एलआयजी वसाहत आहे. या ठिकाणी वारणा, सविनय, आम्रपाली, जयहिंद, घरकुल या पाच गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या ठिकाणी असलेले महापालिकेचे पथदिवे बंद असल्याने रहीवाशाची गैरसोय होत आहे. तसेच एलआयजी परिसरातील विस्तिर्ण बैठ्या चाळी आणि त्या परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता अनेक भागात पथदिवे नसल्याने स्थानिक रहीवाशांना अंधारातच ये-जा करावी लागते. त्यामुळे स्थानिक रहीवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एलआयजी परिसरातील पथदिव्यांची दुरूस्ती करण्यात यावी व त्या ठिकाणी नव्याने पथदिवे बसविण्याची मागणी करत विद्या भांडेकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य आणून दिले होते.
काँग्रेसच्या लेखी पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका प्रशासनाकडून एलआयजीतील नादुरूस्त पथदिव्यांची दुरूस्ती झाली आहे. आता एलआयजीमध्ये सांयकाळनंतर अंधाराएवजी प्रकाश दिसू लागल्यानेे स्थानिक रहीवाशांकडून भांडेकर यांच्या पाठपुराव्यामुळेच हेे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होवू लागली आहेे.