नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ए मधील प्रथमेश सोसायटीच्या मागील बाजूकडील नवीन रस्त्याचे काम अखेरिला पूर्ण झाले आहे. स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक रहीवाशांची गेल्या अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्याने रहीवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका स्थापनेपासून येथील रस्ता प्रस्तावित होता. गेल्या २०-२५ वर्षात या रस्त्याबाबत स्थानिक रहीवाशांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत या सभागृहात गेल्यावर स्थानिक रहीवाशांनी पुन्हा त्या रस्त्याबाबत आग्रही मागणी त्याच्यांकडे केली. या मागणीबाबत मागील काही वर्षापासून आपली केवळ टोलवाटोलवीच झाली असल्याची नाराजीही नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांच्याशी चर्चेदरम्यान व्यक्त केली होती.
महापालिका सभागृहात गेल्यापासून या रस्त्याबाबत नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या त्या महापालिका आयुक्तांची भेट घेवून रस्त्याबाबतची मागणी सतत केली. पालिका प्रशासनदरबारी सातत्याने लेखी निवेदनेही या रस्त्याबाबत नगरसेविका भगत यांनी सादर केली. अखेरिला नगरसेविका सौ. रूपाली भगत यांच्या पाठपुराव्याची दखल घेत या रस्त्याचे काम नुकतेच महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या २०-२२ वर्षापासून रखडलेल्या कामाला नगरसेविका रूपाली भगत यांच्या पाठपुराव्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे समाधान स्थानिक रहीवाशांकडून उघडपणे व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम होत असताना गणेश भगत व रवींद्र भगत हे त्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित होते.
****
सुविधा पुरविण्याची घेतोय आम्ही खबरदारी
रस्ता, परिसर स्वच्छ ठेवण्याची तुम्ही घ्या जबाबदारी
गेली २० वर्षापासुन न झालेला नेरूळ सेक्टर-१६ ए प्रथमेश सोसायटी पाठीमागील नवीन रस्ता डांबरीकरणाचे काम आम्ही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण ४ वर्ष पाठपुरावा करुन मंजुर करुन घेतले आणि डांबरीकरण पुर्ण केले. आता या ठिकाणचा बकालपणा संपुष्ठात आला आहे. आता या ठिकाणी कोणी डेब्रिज टाकू नये, घरातील-सोसायटीतील कचरा या ठिकाणी टाकू नका. अडगळीचे सामान रस्त्यावर फेकू नका. अस्वच्छता व बकालपणा हा काळीमा आपणाला लागणार नाही याची काळजी घ्या.
:- सौ. रूपाली किस्मत भगत
माजी नगरसेविका, प्रभाग ९६