खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून ऐरोली-घणसोली दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी
नवी मुंबई :- एकीकडे नवी मुंबईत होणाऱ्या वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुक कोंडीच्या समस्यांनी येथील नागरीकांची पुरती दमछाक झाली आहे. मात्र, या गंभीर समेस्येचे निराकरण करण्यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी दि २९ मे २०१८ रोजी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पाठपुरावा केला आहे. येथील पर्यायी रस्त्याची लागणारी आवश्यकता लक्षात घेता खासदार राजन विचारे यांनी गेल्या बारा वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या घणसोली – ऐरोली जोडरस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती करण्यासाठी दि २४ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सदर काम गतीमान झाले आहे. अंतिम टप्प्यातील पर्यावरण विभागाच्या परवानगी मिळण्याच्या प्रतिक्षेत असून याची पाहणी आज खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, सिडकोचे मुख्य अभियंता डायटकर, कांदळवनाचे ए सी एफ राजेंद्र मकदूम, उप मुख्य वनसंरक्षक अधिकारी गजेंद्र हिरे, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे, तसेच जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर, अतुल कुलकर्णी, प्रकाश पाटील, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, उप शहर प्रमुख अनिल पाटील, एकनाथ भूखंडे, नगरसेवक एम. के. मढवी, चेतन नाईक, आकाश मढवी, रमाकांत म्हात्रे, विलास भोईर, इतर शिवसेना पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
सिडकोने नवी मुंबई शहर बसविताना बेलापूर ते ऐरोली असा 21.15 किमी लांबीचा पामबीच रस्ता नियोजित केलेला होता. परंतु,19.20 किमी लांबीचा रस्ता सिडकोने सन 2009 पर्यंत घणसोली पर्यंत पूर्ण केला. त्यापुढील भागात कांदळवन असल्याने MCZA,CRZ पर्यावरण व इतर प्राधिकरणाकडे मंजुरी मिळत नसल्याने १.९४ किलोमीटर लांबीचा केबल ब्रीज बांधण्याचा प्रस्ताव नवीमुंबई महानगर पालिकेने मांडला. सदर प्रकल्पासाठी ८०० कोटी खर्च अपेक्षित असल्याने एवढा मोठा खर्च महापालिका पेलू न शकल्याने तो प्रस्ताव रद्द करण्यात आला होता,त्यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची १० जून २०१९ ला भेट घेऊन सदर पुलासाठी अनुदान सिडकोने देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. परंतु याची अंमलबजावणी न केल्याने या कामाला गती मिळत नसल्याने खासदार राजन विचारे यांच्या विनंतीनुसार दि २४ डिसेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करुन या सदर कामाला गती देण्याचे प्रशासनाला आदेश दिले त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने जुन्या प्रस्तावाप्रमाणे १.९४ किलोमीटर असलेला पूल ३.२ किलोमीटर लांबीचा प्रस्ताव बनवून सदर पूल मुलुंड – एरोली टोल मार्गावरच्या एरोली – कटाई या पुलाला जोडण्याचा प्रस्थापित केला आहे. या पुलासाठी ३७२ कोटी रक्कम खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रादेशिक नवीन लिंक मार्ग होणार आहे. नवी मुंबईतील वाहतूककोंडी फुटणार असून याचा फायदा मुंबई, ठाणे, कल्याण –डोंबिवली येथील प्रवाश्यांनाही होणार आहे. खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई शहराच्या विकासासाठी ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , पालकमंत्री एकनाथ शिंदे , महापालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, एम एम आर डी ए आयुक्त, आर ए राजीव साहेब, या सर्वांचे आभार मानले.
चौकट-
महात्मा फुले जंक्शन ते कोपरी उड्डाणपूल पर्यंत मार्ग सुखकर होणार- खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश..
ठाणे बेलापूर मार्गावरील रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून पामबीच मार्गावरून ऐरोली- ठाणेकडे जाण्यासाठी सिटी बँक, ऑरेंज सर्कल, मॉर्डन कॉलेज, ट्रक टर्मिनल, सेक्टर १९, पामबीच गॅलेरिया सेक्टर १४, कोपरी पेट्रोल पंप, कोपरखैरणे जंक्शन या ठिकाणांच्या जंक्शन वरील ८ सिग्नल क्रॉस करून येणाऱ्या या मार्गावर वाशी सेक्टर १७ महात्मा फुले जंक्शन ते कोपरखैरणे जंक्शन यादरम्यान उड्डाणपुलाच्या कामास मंजुरी मिळवली आहे या महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रस्तावास खासदार राजन विचारे प्रयत्न करीत होते यासाठी मा .खासदार राजन विचारे यांच्या विनंतीनुसार दि २४ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करुन सदर कामास सिडकोकडून ५० टक्के अनुदान प्राप्त करून घेतले या कामासाठी एकूण ३४० कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळवली असून हा पूल २.८५ किलोमीटर लांबीचा असून २+२ लेन असलेला असणार आहे
या मार्गामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली व एमआयडीसी क्षेत्रातील रहदारी सुरळीत होणार आहे तसेच नवी मुंबईत नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळवरून मुंबई, ठाणे, कल्याण तसेच डोंबिवलीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी जलद गतीने उपलब्ध होणार आहे व सदर या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना आता होणार नाही त्यांचा प्रवास या उड्डाणपुलामुळे सुखकर होणार आहे.