सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोनाचा विळखा दिवसेगणिक नवी मुंबई शहराला घट्ट बसत चालला असून शनिवार, दि. ३ एप्रिल रोजी शहरामध्ये तब्बल १२०५ कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबईतील कोरोनाच्या आकडेवारीमध्ये हा सर्वाधिक उच्चांक असून कोरोनाची एक दिवसाची आकडेवारी तब्बल बाराशे पार झाल्याने नवी मुंबईकरांसह कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाला आता अग्निदिव्याचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई शहरात आजवर आढळून आलेला हा कोरोनाचा विक्रमी उच्चांक आहे. कोरोनाचा आकडा बाराशेच्या पार गेल्याने नवी मुंबईकरांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबईत आज सर्वाधिक कोरोना रूग्ण नेरूळ विभागात म्हणजेच नेरूळमध्ये ३१२ नव्याने कोरोना रूग्ण आढळून आले आहे. बेलापुर विभागात १४७ कोरोना रूग्ण, वाशी विभागात १८४ कोरोना रूग्ण, तुर्भे विभागात ११६ कोरोना रूग्ण, कोपरखैराणे विभागात १४७ कोरोना रूग्ण, घणसोली विभागात १०७ कोरोना रूग्ण, ऐरोली विभागात १८१ कोरोना रूग्ण, दिघा विभागात ११ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर ६२७ रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे शनिवारी डिसचार्ज देण्यात आला आहे. ३७७३ लोकांनी शनिवारी रॅपिड अॅटिजेन टेस्ट केल्या आहेत. आजवर नवी मुंबईत ११८६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ५९४ कोरोना रूग्णांवर, वाशी सेक्टर १४ मधील कोव्हिड सेंटरमध्ये ८८, वाशीतील ईटीसी कोव्हिड सेंटरमध्ये १५६, तुर्भे सेक्टर१९ मधील निर्यातदार भवन कोव्हिड सेंटरमध्ये २९८, तूर्भे सेक्टर २४ मधील राधास्वामी सत्संग कोव्हिड सेंटरमध्ये ३५५ कोरोना रूग्णांवर, सानपाडा एमजीएम रूग्णालयात ७५ कोरोना रूग्णांवर, नेरूळच्या डीवायपाटील रूग्णालयातील कोरोना विभागात १५८ कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहे. २ लाख २२ हजार ७०३ नवी मुंबईकर होम क्वारन्टाईन होवून कोरोना आजारावर उपचार घेत आहेत.