सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोनाने नवी मुंबईत घातलेले थैमान कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाही. मंगळवारी, दि. ६ एप्रिल रोजी कोरोनाचे नवे १२१२ रूग्ण आढळल्याने कोरोनाच्या विळख्यातच नवी मुंबईकर अजूनही वावरत असल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट झाले. कोरोनामुळे आज नवी मुंबईत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाचा विळखा नवी मुंबई शहरात वाढू लागला आहे. १ एप्रिलला कोरोनाचे नवे ९७१ रूग्ण, २ एप्रिलला कोरोनाचे नवे ९७७ रूग्ण, ३ एप्रिलला कोरोनाचे नवे १२०५ रूग्ण, ४ एप्रिलला कोरोनाचे १४४१ नवे रूग्ण, ५ एप्रिलला कोरोनाचे ११३५ नवे रूग्ण आणि आज ६ एप्रिलला कोरोनाचे १२१२ नवे रूग्ण आढळून आले आहेत. अवघ्या ६ दिवसामध्ये ६९९१ कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आले आहेत.
आज मंगळवारी (दि. ६ एप्रिल) सापडलेल्या कोरोनाच्या नव्या १२१२ रूग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजेच २५३ रूग्ण बेलापुर विभागात आढळून आले आहेत. नवी मुंबई शहरात आज नेरूळ विभागामध्ये कोरोनाचे नवे २१८ रूग्ण, वाशी विभागामध्ये कोरोनाचे १४५ नवे कोरोनाचे रूग्ण, तुर्भे विभागामध्ये कोरोनाचे नवे १६८ रूग्ण, तुर्भे विभागामध्ये कोरोनाचे १६८ नवे रूग्ण, कोपरखैराणे विभागामध्ये कोरोनाचे १२९ नवे रूग्ण, घणसोली विभागामध्ये कोरोनाचे ११७ नवे रूग्ण, ऐरोली विभागामध्ये कोरोनाचे १६२ नवे रूग्ण, दिघा विभागात कोरोनाचे २० नवे रूग्ण आढळून आले आहेत.
आज दिवसभरात महापालिका प्रशासनाकडून ७४१ कोरोना रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिसचार्ज देण्यात आला. रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट आज ४०३३ लोकांनी करून घेतली आहे. नवी मुंबईत आजवर ११९८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. नवी मुंबई शहरातील वाशी सेक्टर १४ मधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ९५ कोरोना रूग्ण, नेरूळ येथील आगरी कोळी भवनातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ६५ कोरोना रूग्ण, ऐरोली सेक्टर ५ येथील समाजमंदिरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ३० कोरोना रूग्ण, वाशी येथील ईटीसी केंद्रातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये १२९ कोरोना रूग्ण, कोपरखैराणे सेक्टर ५ मधील बहूउद्देशिय केंद्रातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ९५ कोरोना रूग्ण, वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ९६४ कोरोना रूग्ण, तुर्भे सेक्टर १९ मध्ये निर्यात भवनमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये २७३ कोरोना रूग्ण, तुर्भे सेक्टर २४ मधील राधास्वामी सत्संगमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ६८ कोरोना रूग्ण, डीवायपाटील रूग्णालयातील कोरोना विभागात १९२ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत आहे. याशिवाय नवी मुंबई शहरामध्ये २ लाख ७० हजार १०० नागरिकांवर होम क्वारन्टाईनच्या माध्यमातून तपासणी व उपचार करण्यात येत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीच्या ६ दिवसातच नवी मुंबई शहरामध्ये जवळपास ७ हजार कोरोनाचे नवे रूग्ण आढळल्याने नवीन कोरोना रूग्णांना आता पालिका कोव्हिड सेंटर तसेच खासगी रूग्णालयात उपचारासाठी जागा मिळणे अवघड जाणार असल्याने होम क्वारन्टाईन रूग्णांच्या संख्येत वाढ होवून आरोग्य विभागाला कोरोना रूग्णांना घरोघरी जावून उपचार करावे लागणार असल्याचे बोलले जावू लागले आहे.