बेस्ट प्राइस सदस्यांसाठी ‘ऑनलाइन शॉपिंग धमाका महिना’
मुंबई : महाराष्ट्रात विशेषतः गर्दीची ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे, मुबई , भिवंडी सारख्या शहरात राज्य शासनाने पुन्हा निर्बंधसह लॉकडाऊन घोषित केला आहे. याचा परिणाम म्हणजे पुन्हा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल निर्माण झाला आहे. याच धर्तीवर फ्लिपकार्ट होलसेलतर्फे बेस्ट प्राइस सदस्यांसाठी ‘ऑनलाइन शॉपिंग धमाका महिना’ सुरू केला आहे. देशभरातील छोट्या किरकोळ विक्रेत्यांची बचत वाढविणे ई-कॉमर्स सुविधा आणि वेगवान घरपोच वस्तू पोहोचविण्याच्या माध्यमातून कोविड ची लागण होऊ नये यासाठी सर्व सुरक्षिततेचे पालन करण्यात येत आहे अशी माहिती वॉलमार्ट इंडिया चे उपाध्यक्ष व प्रमुख आदर्श मेमन यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना मेनन म्हणाले की, “ई-कॉमर्स हे सुरक्षित आणि सुविधाजनक खरेदीमाध्यम झाले आहे आणि विक्री व नफा यांना चालना देण्यासाठी छोटे किरकोळ विक्रेते, किराणा दुकाने आणि कार्यालय समूह यांना ‘ऑनलाइन खरेदी’ ही एक उत्तम संधी आहे. आमचे सदस्य अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन ऑर्डर करू शकतात आणि त्यांच्या दैनंदिन आवश्यकतांच्या वस्तूंवर बचतीचा तसेच विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी मोफत डिलिव्हरीचा लाभ घेऊ शकतात. सोबतच घरपोच वस्तू पोहचविण्याची सेवा देत असतानाच सर्व सुरक्षिततेचे पालन कर्मचारी करीत असतात त्यामुळे खरेदीदार कोणतीही भीती न बाळगता ऑनलाईन खरेदी करू शकत आहेत असेही त्यांनी सांगितले.