लढा अजून संपलेला नाही, यश मिळाल्याशिवाय लढा आपला थांबणार नाही!
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ –Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी सानपाडा सेक्टर २ मधील पालिका क्रिडांगणावरील अतिक्रमणाच्या विरोधात लेखी निवेदनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनदरबारी सुरू केलेला पाठपुरावा आणि स्थानिक जनतेच्या मदतीने उभारलेले जनआंदोलन यामुळे अतिक्रमणकर्त्यांनी क्रिडांगणातून माघार घेताना आपले साहित्यही हटविण्यास सुरूवात केली आहे. प्रसिध्दी माध्यमांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि स्थानिक रहीवाशांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले असले तरी आमचाअतिक्रमणाच्या विरोधातील लढा अजून संपलेला नाही आणि निर्भेळ यश मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नसल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी व्यक्त केली आहे.
सानपाडा सेक्टर २ मधील महापालिका क्रिडांगणावर स्थानिक कॉलेजने सुरू केलेल्या अतिक्रमणाच्याविरोधात व महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेविरोधात भाजपाच्या पांडुरंग आमलेंनी गेल्या काही दिवसापासून स्थानिक रहीवाशांसमवेत प्रशासनदरबारी विरोध नोंदवित सतत निवेदने दिली. आमले यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी लेखी पाठपुरावा केला. स्थानिक जनतेचा अतिक्रमणविरोधातील असंतोष प्रशासनदरबारी व्यक्त करण्यासाठी क्रिडांगणातच आमले यांनी स्थानिक रहीवाशांसमवेत जनआंदोलन केले. प्रशासनदरबारी आमले व स्थअनिक रहीवाशांचा वाढता पाठपुरावा यामुळे वातावरणनिर्मिती व जनजागृती होवू लागली. अतिक्रमण हटविण्यासाठी आमलेंच्या प्रयत्नांना प्रसिध्दी माध्यमांचीही चांगली साथ लाभली. सध्या महापालिकेच्या क्रिडांगणावरून अतिक्रमणकर्त्यांनी माघार घेतली असून तेथील साहीत्यही काढून घेण्यास सुरूवात केलेली आहे. हा आपल्या सर्वाच्या एकजुटीचा व संघर्षाचा विजय असल्याचेआमले यांनी सांगत या लढ्यात रिटा सोनी, महालक्ष्मी, ब्रिगेन्झा, डॉ. अंकुश, अकुंश पाटील, अशोक खुपटे, विक्रम जगताप, मोदी यांचीही भूमिका तितकीच महत्वाची आहे. लढा आपला थांबलेला नाही, अतिक्रमण पूर्णपणे हटेपर्यत लढा आपला सुरूच राहणार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखविला, त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, विश्वास ठेवा, खात्री बाळगा. आपल्यातील एकजुट कायम ठेवू असे आमले यांनी यावेळी सांगितले.