सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘नवी मुंबई महानगरपालिकेत काम करणारे ७२०० कामगारांना कायम कामगारांप्रमाने पगार द्या’ अशी मागणी शुक्रवारी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे नवी मुंबई मनसेकडून करण्यात आली.
कायम कामगारांना ५५०००/- हजार व कंत्राटी कामगारांना २५०००/- अशी तफावत का असा सवाल शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी विचारला. सर्व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करून कायम कामगारांप्रमाणे पगार देण्यात यावा अशी मागणी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली.
भारतात लागू केलेल्या ४४ कामगार कायद्याचे आता चार विभागात हस्तांतर केले आहे. त्यातही (Equal Remuneration Act 1976) समान काम समान वेतन १९७६ याची व्याप्ती फक्त महिला कामगारांनपूर्ती मर्यादित न ठेवता सर्व प्रकारच्या कामगारांना या कायद्यानुसार समान काम समान वेतन देण्यात यावे अशी मागणी कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी मांडली
मनसे मनपा युनियनच्या समान काम समान वेतनाच्या सर्व मागणीवर चर्चा करून प्रस्ताव पाठवू असे नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.
यावेळी युनियन अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, मनविसे अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार संघटक सनप्रीत तूर्मेकर, युनियन उपाध्यक्ष देवा भोईर, रणजित सुतार, रमेश पऱ्हाड, अरविंद बोबले, सुनील राठोड, हेमंत गायकवाड, संघटक गणेश भांगरे, अंकुश शिंदे, मारुती डोंगरे, कामगार सेना सदस्य गणेश खंदारे उपस्थित होते.