सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण शुक्रवारीही (दि. ९ एप्रिल) कायम राहीले आहे. कोरोना रूग्णांनी शुक्रवारी कोरोनाचा हजारचा आकडा ओंलाडला असून ५ जणांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. कोरोना पर्व सुरू झाल्यापासून कोरोनाने आजपर्यत १२११ जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी आढळून आलेल्या १०३३ नव्या रूग्णांमध्ये शहरात सर्वाधिक रूग्ण २२७ बेलापुर विभागात आढळून आले आहेत. नेरूळ विभागात १७७ नवे कोरोना रूग्ण, वाशी विभागात १५८ नवे कोरोना रूग्ण, तुर्भे विभागात ८४ नवे कोरोना रूग्ण, कोपरखैराणे विभागात १३५ नवे कोरोना रूग्ण, घणसोली विभागात ८६ नवे कोरोना रूग्ण, ऐरोली विभागात १४६ नवे कोरोना रूग्ण, दिघा विभागात २० नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. ७२९ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आज महापालिकेने डिसचार्ज दिला आहे.