नवी मुंबई : होम क्वारन्टाईनची घरावर तसेच सोसायटीत नोटीस लावण्यापूर्वी रूग्णालला कोरोना झाल्याची तारीख तपासण्याची मागणी नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २० परिसरात रेल्वे स्टेशनलगत तेरणा रूग्णालयाजवळील टॉवरमध्ये राहणाऱ्या युवकाला २८ मार्च रोजी कोरोना झाला. कोरोना झाल्यापासून घर टूबीचके असल्याने पालकांनी त्या मुलाला होम क्वारन्टाईन केले. आज तो मुलगा क्वारन्टाईन झाल्याच्या घटनेला १४ दिवसाचा कालावधी लोटला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे महापालिका प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून होणाऱ्या विलंबाला आजच्या कोरोना उद्रेकाच्या काळात अकार्यक्षमता निश्चितच म्हणता येणार नाही. आज १० एप्रिल रोजी रोजी महापालिका प्रशासनाकडून त्या घरावर आणि सोसायटीवर नोटीस चिपकवण्यात आली व त्यात यापुढे १७ दिवस हा मुलगा घराबाहेर पडल्यास २५ हजार रूपये दंड आकारण्यात येईल असे बजावण्यात आले. जो मुलगा १४ दिवस घरातच एक रूममध्ये बंदीस्त आहे. त्याला कोरोना झाला २८ मार्चला, महापालिका प्रशासन नोटीस लावतेय १० एप्रिलला. हा प्रकार चुकीचा आहे. आधीच कोरोनामुळे अर्थकारण बिघडले असल्याने लोकांची मानसिकता बिघडलेली आहे. त्यातच जी व्यक्ति १४ दिवस पूर्णपणे एकाच घरात बंदीस्त आहे, त्याला अजून १७ दिवसाची नोटीस. मुळातच कोरोना होवून १४ दिवस उलटले आहेत. यामुळे तेथील सोसायटीत व आजूबाजूच्या परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कोरोना होवून १४ दिवस उलटल्यावर महापालिका प्रशासनाला जाग येते काय? असा संतप्त सवाल रहीवाशी विचारत आहे. अशाच घटना कायम राहील्यास हाणामारीच्या घटना होवून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न कोरोना काळात निर्माण होवू शकतो. लोकांची मानसिकता व समस्येचे गांभीर्य जाणून घ्या. कोरोनाने होमक्वारन्टाईन झालेल्या लोकांना कोरोना कधी झाला आहे याची सर्वप्रथम महापालिका प्र्रशासनाने खातरजमा करून घ्यावी. त्यांनी होम क्वारन्टाईन केलेले असतानाही पालिकेला १२ ते १५ दिवसांनी वेळ मिळेल तेव्हा नोटीस लावणे हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधितांना नोटीस देण्यापूर्वी कोरोना कधी झाला आहे व रूग्ण क्वारन्टाईन कधीपासून आहे याची खातरजमा करून घेण्याचे निर्देश द्यावेत. लोक कोरोना झाल्यावर भीतीने घरातील अन्य सदस्यांच्या काळजीने होम क्वारन्टाईन करत आहे. जायबंदी माणसाची अथवा घरात खितपत पडलेल्या माणसाची काळजी घेणे आणि क्वारन्टाईन माणसाची काळजी घेणे सारखाच प्रकार आहे. त्यामुळे आधीच १२-१५ दिवस सांभाळ केलेल्या होम क्वारन्टाईन माणसाची काळजी महापालिका प्रशासनाने नोटीस दिली म्हणून कोणी अजून १७ दिवस घेण्यास तयार होणार नाही. आधीच महापालिका प्रशासनाकडे कोरोना झाल्यावर रूग्णांना उपचारासाठी जागा मिळत नाही. काल तुर्भ्यातील राधास्वामीमध्ये ऑक्सिजन लावलेल्या रूग्णाला अर्धा तास ऑक्सिजन सुरूच झाला नाही. नुसती मशीन लावली होती. हा उपचाराचा प्रकार आहे. चौकशी करून खातरजमा करून घ्या. त्यामुळे नोटीस देण्यापूर्वी कोरोना कधी झाला आहे याची नोटीस देणाऱ्या पालिकेच्या संबंधितांना खातरजमा करून घेण्याचे निर्देश द्यावेत. लोक कोरोनामुळे त्रस्त आहेत, रोजगार गेले आहेत. आधीच क्वारन्टाईन असणाऱ्या रूग्णाला १५ दिवस विलंबाने नोटीस देवून अजून १७ दिवस क्वारन्टाईन होण्याचा सल्ला देण्याचा ‘तुघलकी’ प्रकार पूर्णपणे थांबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.