नवी मुंबई : कंटेंन्मेंट झोन व हॉटस्पॉट क्षेत्रात महापालिका प्रशासनाने सुरू केलेली अॅण्टीजेन टेस्ट नवी मुंबई शहरातील इतर भागातही सुरू करण्याची मागणी भाजपच्या युवती मोर्चाच्या अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेने अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कंटेंन्मेंट झोन व हॉटस्पॉट क्षेत्रातच ही टेस्ट केली जात आहे. मात्र शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचे वाढत असलेले रूग्ण पाहता कंटेंन्मेंट झोन वगळता देखील अनेक भागांत या टेस्ट होणे गरजेचे आहे. अनेक नागरिक स्वतःहून या टेस्ट करून घेण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याचसाठी पालिकेलाच मदत होणार आहे. पालिकेने प्रभाग क्र. ८४ मधील नेरूळ सेक्टर २ व ४ मध्ये अँटिजेन टेस्टचे कॅम्प लावावेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हीही पालिकेला मदत करून नागरीकांची जनजागृती करण्यास मदत करू. पालिकेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोना महामारी नियत्रंणात आणण्यासाठी नवी मुंबई शहराच्या कानकोपऱ्यात अॅण्टीजेन टेस्ट सुरू करावी असे सुहासिनी नायडू यांनी निवेदनात म्हटले आहे.