नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीमुळे सगळीकडेच अर्थकारणाची घडी विस्कटलेली आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. घरातील कर्त्या माणसाला गमविल्याने घराघरातील समीकरणे बिघडली आहेत. घरामध्ये असणाऱ्या विधवा महिलांना आता हलाखीच्या स्थितीत जीवन जगावे लागत आहे. यजमान गेल्याने विधवा महिलांच्या दु:खात आणखीनच भर पडली आहे. पालिका प्रशासनाने आता विधवा महिलांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. विधवा महिलांना दिलासा देण्यासाठी त्यांना आर्थिक हातभार लावणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. शहरातील विधवा महिलांना दर महिन्याला ठराविक आर्थिक रक्कम महापालिका प्रशासनाने द्यावी. ही रक्कम थेट विधवा महिलांच्या बॅक खात्यात जमा करावी. विधवा महिलांची जबाबदारी आता आपली आहे. त्यामुळे त्यांना दर महिन्याला विशिष्ठ रक्कम महापालिका प्रशासनाकडून देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.