नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नेरुळमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी वेगळे लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी भाजयुमोच्या युवती अध्यक्ष सौ. सुहासिनी रमेश नायडू यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाने लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र बनविणे आवश्यक आहे. नागरी आरोग्य केंद्रात जाण्यासाठी प्रभाग 84 मधील ज्येष्ठांना व दिव्यांग नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. या प्रभागात नागरी आरोग्य केंद्र नसल्याने कुकशेत अथवा शिरवणे या ठिकाणी लस घेण्यासाठी ज्येष्ठांना व दिव्यांगाना जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग 84 मधील ज्येष्ठांची व दिव्यांगाची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी भाजयुमोच्या युवती अध्यक्ष सौ. सुहासिनी रमेश नायडू यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.