नवी मुंबई : कोपरखैराणे, प्रभाग ४२ मधील सेक्टर २२ विरगुंळा केंद्रामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना मोफत लसीकरण उपलब्ध करून दिले जात आहे. कोपरखैराणे नोडची लोकसंख्या आता काही लाखापर्यत पोहोचली आहे. कोपरखैराणेवासियांना केवळ सेक्टर ११ मधील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर सर्व कोपरखैराणेवासियांना लस उपलब्ध व्हावी व स्थानिक रहीवाशांना येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग ४२ मधील सेक्टर २२ या ठिकाणी असलेल्या विरंगुळा केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.