नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील विविध नागरी समस्यांचे तात्काळ निवारण करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे., सध्या नवी मुंबईत अवकाळी पाऊस व जोरदार वारे गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अवघ्या ४ दिवसावर येवून ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील नागरी समस्यांचे लवकरात लवकर निवारण होणे आवश्यक आहे. प्रभागातील समस्यांबाबत आयुक्तांनी त्यांच्या कार्यालयातील पत्रव्यवहारांवर नजर फिरविल्यास त्यांना आमच्या प्रभागातील समस्यांची कल्पना, आम्ही सातत्याने आपणाकडे केलेला लेखी पाठपुरावा, समस्या सोडविण्यामागील आमची प्रामाणिक भावना व कळकळ निदर्शनास येईल. प्रभाग ९६ मधील नागरी समस्यांचे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करताना केली आहे.
प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. येथील सिडको वसाहतीमधील अंतर्गत भागात व सोसायटीबाहेरील अंर्तगत व बाह्य रस्त्यांवर वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. यातील अधिकांश वृक्ष हे जुनाट व ठिसूळ झालेले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दरवर्षी वृक्षांची पडझड, फांद्या पडणे, इमारतीच्या संरक्षक भिंतीची पडझड होणे, रहीवाशी जखमी होणे, गंभीर दुखापती होणे अशा घटना वारंवार प्रभागात घडल्या आहेत. या घटना पावसाळा कालावधीतच घडल्या असून आताही पावसाळा अवघ्या काही दिवसावर येवून ठेपल्याने आपल्या निदर्शनास या समस्येचे गांभीर्य आणून देत आहोत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रभागातील धोकादायक वृक्षंची तसेच ठिसूळ झालेल्या फांद्यांची छाटणी लवकर करणे आवश्यक आहे. छाटणी न झाल्यास वित्त व जिवितहानी होण्याची भीती आहे. लवकरात लवकर म्हणजे येत्या काही तासामध्ये वृक्षछाटणी अभियान राबविण्यात यावे! करण्यात आलेली वृक्षछाटणी व फांद्या पदपथावर तसेच रस्त्यावर पसरवून न ठेवता तात्काळ महापालिका प्रशासनाने हटवावे. जेणेकरून स्थानिक रहीवाशांना कोणताही त्रास होणार नसल्याचे गणेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून दरवर्षी गटारांची सफाई करण्यात येते. परंतु ही सफाई तळापासून झाल्यास गटारातील तुंबलेला कचरा, गाळ, मातीचे ढिगारे आदी समस्या संपुष्ठात येतील. गटारांची तळापासून सफाई न झाल्यास दोन-तीन दिवस जरी संततधार पाऊस पडला तरी परिसर जलमय होण्याची व पाणी तुंबण्याची भीती आहे. प्रभागातील सर्वच गटारांची तळापासून सफाई करण्यात यावी की जेणेकरून पावसात गटारे तुंबणार नाहीत व तुंबलेल्या गटारातील पाणी रस्त्यावर वाहणार नसल्याचे गणेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ नोडमध्ये केवळ प्रभाग ९६ मध्येच गटारावरील झाकणांची चोरी झालेली आहे. याबाबत आम्ही असंख्य वेळा तक्रारी करून ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आपण गटारांवरील झाकणांच्या अवस्थेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती प्राप्त करून घ्यावी. तुटलेल्या झाकनांची दुरूस्ती अथवा नवीन बसवावीत तसेच चोरीला गेलेल्या झाकणांच्या बदली नवीन झाकणे बसविण्यात यावी. पावसामध्ये पाण्यात पदपथावरून चालताना तुटलेल्या अथवा चोरीला गेलेल्या झाकणाच्या जागी रहीवाशांना गंभीर दुखापत होण्याची भीती आहे. आपण संबंधितांकडून तुटलेल्या तसेच चोरीला गेलेल्या झाकणांची जागी नव्याने झाकणे बसवावीत. पावसाळा तोंडावर आला असल्याने ही कामे अत्यावश्यक सेवेचाच एक भाग म्हणून आगामी काही तासामध्ये होणे आवश्यक असल्याचे गणेश भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाकडून बसविण्यात आलेल्या प्रभागातील पथदिव्याबाबतही तातडीने पाहणी अभियान राबवावे. पथदिव्यातील ज्या ठिकाणचे दिवे कार्यरत नाहीत अथवा कमी उजेड देतात, ते तातडीने बदली होणे आवश्यक आहे.याशिवाय पदपथावर असलेल्या पथदिवे, डिपी यांच्या वायरी, केबल्स जर कोठे विखुरल्या असतील अथवा कोठे तुटलेल्या असतील तर त्याचीही दुरूस्ती युध्दपातळीवर होणे आवश्यक आहे. याशिवाय पदपथावर असलेले पथदिवे, डिपी यांच्या वायरी, केबल्स जर कोठे विखुरल्या असतील अथवा कोठे तुटलेल्या असतील त्याचीही दुरूस्ती युध्दपातळीवर होणे आवश्यक आहे. पाहणी अभियानात धोकादायक अवस्थेत असलेले पथदिवे तात्काळ हटवून त्या ठिकाणी नवीन पथदिवे बसविण्याबाबत संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी गणेश भगत यांनी केली आहे.
पावसाळा आता तोंडावर अवघ्या काही दिवसावर आला असल्याने प्रभागातील या समस्यांचे तातडीने निवारण होणे आवश्यक आहे. पावसाळ्यात लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, जिवित अथवा वित्त हानीचा सामना करावा लागू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे. आयुक्तांनी समस्येचे गांभीर्य ओळखून संबंधितांना तातडीने प्रभाग ९६ मधील समस्यांचे निवारण करण्याचे आपण महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी गणेश भगत यांनी केली आहे.