Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ -९८२००९६५७३
नवी मुंबई : कोव्हीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत असून याकरिता विविध उपययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. २२ मे २०२१ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेस सीएसआर फंडातून नोकार्क या कंपनीचे ५ व्हेन्टिलेटर्स प्राप्त झालेले होते. याविषयी काही प्रसारमाध्यमांतून हे व्हेन्टिलेटर्स “Rejected” असल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या.
त्या अनुषंगाने दि. २५ मे २०२१ रोजी नोकार्क या कंपनीचे बायोमेडिकल इंजिनियर आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे बायोमेडिकल इंजिनियर यांनी सदर व्हेन्टिलेटर्स इंन्स्टॉल करून तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली. या तपासणीअंती या ५ व्हेन्टिलेटर्समध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. हे व्हेन्टिलेटर्स वापरण्यायोग्य तसेच संपूर्ण सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य असल्याने सदर व्हेन्टिलेटर्सचा वापर सुरु करण्यात आलेला आहे.