Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६, ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात अनाथाश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व त्यानंतर वृक्षारोपण अशा कार्यक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करताना पर्यावरणप्रेमी असलेले समाजसेवक रवींद्र भगत यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
वाढदिवस म्हटल्यावर पार्टी, पिकनिक अशा कार्यक्रमांना एकीकडे खतपाणी घातले जात असताना सामाजिक बांधिलकीचे भान जोपासताना रवींद्र भगत यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करत कृतीतून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त रवींद्र भगत यांनी सकाळी नेरूळ सेक्टर १६ ए मधील ‘जीवनज्योती आशालय’मधील मुलांना शैक्षणिक साहित्य, चॉकलेट, बिस्किट यांचे वाटप केले. त्या मुलांसमवेत बराच वेळ घालविल्यानंतर आपल्या मित्रपरिवारासोबत नेरूळ सेक्टर २४ परिसरात श्री. झोटिंगदेव-बामणदेव मैदानात रवींद्र भगत यांनी वृक्षारोपण केले.
यावेळी भगत यांच्यासमवेत अनंत कदम, पांडुरंग मोरे, सदानंद गमरे, सागर मोहिते, मंगेश कदम, नंदेश भगत, शत्रु्घ्न म्हात्रे, श्रीकांत ठाकूर, जयेश पवार, जयेंद्र नागरजी, अजय खंबे उपस्थित होते.