Navimumbailive.com@gmail.com -८३६९९२४६४६ -९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी प्रभाग ९६च्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले प्रयत्न खरोखरीच प्रशंसनीय आहेत. एकेकाळी दोन हजाराच्या आसपास गेलेली दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या आता ५०-७५च्या घरात आलेली आहे. सध्या प्रशासनाकडून ४५ वर्षे वयोगटावरील सर्वानाच लसीकरण सुरू आहे. वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील सर्वासाठी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. प्रभाग ९६ मधील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सर्वाकडून लसीकरणासाठी आमच्या कार्यालयात येवून आग्रही मागणी करण्यात येत आहे. खासगी रूग्णालयात जावून पैसे देवून लसीकरण सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील १८ ते ४४ वयोगटातील रहीवाशांसाठी, युवकांसाठी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर लसीकरण मोहीम राबवून प्रभाग ९६ खऱ्या अर्थाने कोरोना मुक्त करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलण्याची मागणी प्रभाग ९६च्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.