Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 16 मधील सीब्रीज सोसायटी (टॉवर) व सेक्टर 18 मधील सागरदर्शन सोसायटीमधील (टॉवर) रहीवाशांसाठी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेले लसीकरण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये 1300 रहीवाशांनी सहभागी होत लस घेतल्याची माहिती जनसेवक गणेश भगत यांनी दिली.
या सोसायटीमधील रहीवाशांसाठी स्वतंत्रपणे लसीकरण आयोजित करण्यासाठी भाजपाच्या माजी स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी ठाण्याचे माजी पालकमंत्री व भाजपाचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना साकडे घातले. आ. गणेश नाईकांनी रिलायन्स रूग्णालयाच्या माध्यमातून हे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यास गणेश भगत यांना मदत केली.
बुधवारी (दि. 2 जुन) सकाळी 9 ते सांयकाळी 6.30 वाजेपर्यत या दोन्ही सोसायट्यांमध्ये हे लसीकरण शिबिर आयोजण्यात आले होते. दोन्ही सोसायटीतील 1300 रहीवाशांनी शिबिरामध्ये लस घेतली. सागरदर्शन सोसायटीमधील 5 अपंग व्यक्तिंना गणेश भगतांच्या पुढाकारामुळे रिलायन्स रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घरी जावून लस दिली.
या शिबिरामध्ये जनसेवक गणेश भगत सकाळपासून सांयकाळी उपस्थित होते. ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे युवा नेते सुरज पाटील, माजी नगरसेवक विशाल डोळस, अशोक गांडाळ, सागर मोहिते आदींनी शिबिराला भेट दिली.
यावेळी सागरदर्शन सोसायटीतील डॉ. सुब्रोतो साहा, सोनु अग्रवाल, रश्मी ओबेराय, आलोक सिंग, मनोज सटिया, रविंद्र सैनी, सुखविंदर सिंह संधु, राजीव लोचन, मोहित जैन, सी.एम.कृष्णा, क्रिश्नन जगतियानी, प्रणव कोपकर, लीना सैनी, अंकिता बाफना, रिटा राणा, दिक्षा, शर्मिष्ठा झा, के. के. ठाकूर, भक्ती, संगीता, सीब्रीज सोसायटीतील नवीन सिंग, राजीव सुद, त्रिपाठी आदी रहीवाशांनी उपस्थित राहून लसीकरण शिबिराच्या आयोजनात पुढाकार घेतला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोसायटी आवारातच रिलायन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून लस उपलब्ध करून दिल्यामुळे दोन्ही टॉवरमधील रहीवाशांनी जनसेवक गणेश भगत यांचे आभार मानले.