स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : जागतिक पर्यावरणदिनानिमित्त शनिवारी (दि. ५ जुन) प्रभाग ७६ मध्ये भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून पालिकेच्या अविकसित भुखंडाचे सुशोभीकरण, रंगरंगोटी व तेथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांडुरंग आमले यांनी स्थानिक रहीवाशांच्या मागणीला न्याय देताना सानपाडा सेक्टर २ येथील व सेक्टर ८ येथील दुर्लक्षित भूखंडावर असणारे डेब्रिज घनकचरा काचा जेसीबी व डंपरच्या मदतीने हटवून त्यावर लाल माती टाकून त्या अविकसित भुखंडाचे सुशोभीकरण करण्यात आले.
आज जागतिक पर्यावरण दिन दिवशी भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व जिल्हा महामंत्री विजय घाटे, सानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निकम, जेष्ठ नागरिक कलाकार काजरोळकर, स्वस्तिक नर्मदा सर्व टीम, प्रियांका, स्वस्तिक, छाया,घरकुल सोसायटी सर्व टीम आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन बाजूच्या भिंती बोलक्या केल्या. भिंतीवर रंगरंगोटी करून सुशोभीकरणही करण्यात आले.
पुढील काही दिवसात जेष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडे व घनकचऱ्यापासून खत तयार करणार असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अविकसित भुखंडाचे सुभोशीकरण, वृक्षारोपण करून परिसराचा बकालपणा हटविल्याबाबत स्थानिक रहीवाशांनी पांडुरंग आमले यांचे आभार मानले.