नवी मुंबई : कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या जनतेला अन्नधान्याचे वितरण गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवी मुंबई भाजप यांच्यावतीने नवी मुंबईत सुरू आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, भाजप आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी एकीकडे आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून एकीकडे सतत अन्नधान्याचे वाटप तर दुसरीकडे कोरोना महामारीवर प्रशासनाकडून होणाऱ्या उपाययोजनांबाबत दर आठवड्याला लोकनेते गणेश नाईक आपल्या सहकाऱ्यांसमवेत जावून पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत नवी मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. प्रभाग 96 मधील लोकनेते गणेश नाईक यांचे कट्टर कार्यकर्ते जनसेवक गणेश भगत यांनी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवी मुंबई भाजप यांच्या माध्यमातून आलेले धान्य घरोघरी जावून रहीवाशांना वितरीत करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे संततधार पाऊस असतानाही गणेश भगत यांनी घरटी धान्य मदतीचे कार्य सुरूच ठेवल्याने रहीवाशांकडून या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे.
प्रभाग 96 मध्ये नेरूळ सेक्टर 16, 16ए आणि 18 या परिसराचा समावेश होत आहे. गणेश भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभागात सर्वानाच घरी जावून धान्याची मदत पोहोचविण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून (दि. 10 जुन) घरोघरी जावून धान्य पोहोचविण्यास सुरूवात झाली असून पहिल्या टप्प्यात जनसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर 16 मध्ये घरोघरी जावून हे अभियान राबविण्यात आले आहे. गणेश भगत यांच्यासमवेत सागर मोहिते, वासुदेव पाटील, विकास तिकोणे, आनंद कदम, गोरक्षनाथ गांडाळ, चंद्रकांत महाजन, रमेश नार्वेकर, अशोक गांडाळ, रोहित चव्हाण. राजेश घाडी. शयेश परशेट्टी, श्रीधर मोरे संदेश घाडी, अजय नवले, शुभम पाटणकर, शुुभम नवले, अजय नवले, सुभाष यादव,.नवीन पाठारे, सग्रामसिंह चव्हाण, गौरव सावंत, सौरव सावंत आदींनी धान्य वितरणात सहभागी होत स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याचे काम केले आहे. साखर, तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ आदी धान्य मिळाल्याने स्थानिक रहीवाशी लोकनेते गणेश नाईकांच्या जनसेवी कार्याची प्रशंसा करत आहेत.