संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबईकरांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे केले आरती ओवाळून स्वागत…
नवी मुंबई : राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी वर्षभरात ५३ हजार घरी मोफत पुस्तक वाटपाचा संकल्प केला आहे. त्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज स्वतः गजानन काळे यांनी घरोघरी पुस्तक वाटून केला. ‘एक कुटुंब एक पुस्तक’ या पद्धतीने गजानन काळे यांच्यासह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शेकडो पुस्तके घरोघरी देऊन पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
पुस्तक वाटप करताना लोकांमध्ये एवढा उत्साह होता की अनेक लोकांनी आरती ओवाळून मनसे पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावरून लोकांचे राजसाहेबांवर असलेले प्रचंड प्रेम दिसून येते आणि लोकांनी राजसाहेब ठाकरेंना या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुस्तके घेऊन लोकांशी भेटताना लोकांनी या अभिनव उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पुस्तकांची नोंदणी केल्याचे दिसून येते. या उपक्रमात भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख, डॉ. जयसिंगराव पवार यांचे छत्रपती संभाजी एक चिकित्सा, प्रबोधनकार ठाकरे यांचे माझी जीवनगाथा, मंगेश पाडगावकरांचे जिप्सी या पुस्तकांना प्रचंड मागणी असल्याचे दिसून आले. मनसेने पुस्तक निवडण्यासाठी दिलेली १०० मराठी पुस्तकांची यादी अनेक वाचकांना आवडली. काही वाचकांनी इतर लेखकांची पुस्तके यादीत समाविष्ट करावी असेही मनसे पदाधिकाऱ्यांना सुचवले आहे. तरी काही वाचकांनी इंग्रजी पुस्तके हि या उपक्रमात समाविष्ट करावी असे सुचवले आहे. नवी मुंबईकरांच्या मागणीनंतर नवीन पुस्तके समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू असे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले आहे.
आज १४ जून २०२१ ते १४ जून २०२२ पर्यंत हे अभियान चालू राहणार आहे. मनसेचे कार्यकर्ते यापुढेही जशी पुस्तकाची नोंदणी होईल तशी पुस्तके घरोघरी जाऊन देणार आहेत. मनसेच्या या उपक्रमाचे विविध समाज माध्यमांवर अनेक वरिष्ठ पत्रकार, विचारवंत आणि नागरिकांनी कौतुक केले आहे.
या अभिनव उपक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. असे नवनवीन उपक्रम नागरिकांसाठी घेऊन मनसे सदैव येईल असा विश्वास मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. घरोघरी पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या सोबत उप शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, मनविसे शहर संघटक संदेश डोंगरे, रोजगार विभागाचे शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहर अध्यक्ष सागर नाईकरे , विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, अक्षय भोसले, विनोद पाखरे, उप विभाग अध्यक्ष निलेश जाधव, मंगेश जाधव, शाखा अध्यक्ष नरहरी कुंभार, अक्षय कदम, प्रमोद डेरे हे उपस्थित होते.
नवी मुंबईकरांना मोफत पुस्तक घरी मिळण्याच्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर ते https://forms.gle/ 7tss Nv E w XPiki5J67 या लिंक वर नोंदणी करू शकतात किंवा ९०९०५०५०६७, ९६६४२७८७१७ या क्रमांकावर संपर्क करू शकतात.