संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
कंत्राट रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा – नितीन चव्हाण
नवी मुंबई : शनिवार दिनांक १२ जून २०२१ रोजी नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिकांनी व विविध संघटनांनी सिडको प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे. या किल्ल्याचे संवर्धन व्हावे म्हणून राज्यातील अनेक संघटना प्रयत्न करत होत्या, परंतु सिडकोच्या निष्काळजी कामामुळे या किल्ल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत गेले. यावर संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून करण्यात आली.
या किल्ल्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवी मुंबई देखील आग्रही होती, या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी सिडको प्रशासनासोबत अनेक पत्रव्यवहार व आंदोलने केली. परंतु सिडकोने मात्र या किल्ल्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे किल्ल्याचे कंत्राटदारांनी कामाचा दर्जा न राखता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरु ठेवले, परिणामी निव्वळ तीन दिवसांच्या पावसाने नव्याने दुरुस्ती करण्यात आलेला बुरुज ढासळला.
या संपूर्ण प्रकारामुळे सिडको प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवी मुंबईच्या वतीने शिवरायांच्या मावळ्यांच्या वेशात सिडको भवन ला धडक देऊन आंदोलन केले, बेलापूर किल्ला दुरुस्ती साठी देण्यात आलेल्या कंत्राटदाराचे काम रद्द करून संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी केली, तसेच या किल्ल्याचे यापूढील संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने करावे अशी मागणी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष सौरभ काळे यांनी केली, आणि ४८ तासात कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा तेजस शिंदे यांनी दिला.
यावेळी आंदोनात प्रशांत सोळस्कर , विशाल भिलारे , अमोल मापारी,राम पुजारे, विश्वजित भोईटे , संदीप मोहिते , अजय सुपेकर, तुषार कचरे ,आकाश पाटील , सौरभ काळे उपस्थित होते.