संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६६५७३
नवी मुंबई : कोपरखैराणे, प्रभाग ४२ मधील सेक्टर १६, १७, २२, २३ परिसरातील पदपथांची ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोपरखैरणे प्रभाग ४२ मध्ये सेक्टर १६, १७, २२, २३ या विभागाचा समावेश होत असून गृहनिर्माण सोसायट्या तसेच बैठ्या चाळींचाही यात समावेश आले. सध्या पावसाळा सुरू झाला असून प्रभागातील सेक्टर १६, १७, २२, २३ विभागात असणाऱ्या पदपथांची तसेच सिडको गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागातही महापालिका प्रशासनाने ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करावी, यासाठी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाला साकडे घातले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. संततधार पाऊस पडल्यावर पदपथावर शेवाळ साचून निसरडे होतात. पदपथावरून चालताना महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडतात. त्यांना जखमा होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये कोपरखैराणे सेक्टर १६, १७, २२, २३ परिसरातील सर्वच पदपथांची ब्लिचंग पावडर टाकून महिन्यातून तीन वेळा सफाई करण्यात यावी. ज्यायोगे संततधार पाऊस पडला तरी पदपथ निसरडे होणार नाहीत. पदपथासोबत सिडको सोसायटीच्या अंर्तगत भागात तसेच श्रमिकांच्या एलआयजीमध्ये तसेच चाळींमध्ये बाहेरील भागात ब्लिचंग पावडरची फवारणी करावी. कोणी चालताना घसरून पडणार नाही व जखमीही होणार नाही. संततधार पाऊस नुकताच चालू झाला आहे. समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देत असल्याने गांभीर्य ओळखून कार्यवाही करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.