संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : गेल्या काही वर्षापासून महापालिका ते मंत्रालयीन पातळीवर महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी पाठपुरावा करत असल्याने गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई इंटकला व नवी मुंबई इंटकशी संलग्न कामगार संघटनांना कामगारांचे पाठबळ सदस्यत्वाच्या स्वरूपात पहावयास मिळाले आहे. गुरूवारी (दि. १७ जुन) वाशीतील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयात काम करणाऱ्या मावशी व वार्ड बॉय या कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व स्विकारत युनियनमध्ये जाहिरपणे प्रवेश केला. नवी मुंबई मनपा आरोग्य विभागातील नागरी आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच इंटकचे सदस्यत्व स्विकारले आहे.
कामगार नेते रवींद्र सावंत यांची नवी मुंबई इंटकच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या सर्वच संवर्गात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या समस्या निवारणासाठी महापालिका मुख्यालय, विभाग अधिकारी कार्यालय तसेच मंत्रालय आदी ठिकाणी रवींद्र सावंत यांनी पाठपुरावा सुरू केला. कामगारांच्या सेवेबाबत, वेतनवाढीबाबतचे विविध प्रस्ताव कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेला राज्य सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवायला लागले आहेत. मंत्रालयीन पातळीवर नवी मुंबईतील कामगारांच्या समस्या नवी मुंबई इंटकमुळे प्रकाशझोतात आल्या आहेत.
आज वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील मावशी व वार्ड बॉय यांनी इंटकसंलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनमध्ये प्रवेश केला. यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला. यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीमध्ये हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी प्रमोशन न मिळणे, सर्व्हिस बुक तयार नसणे, आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीस होणारी टाळाटाळ आदी समस्यांचा पाढा कामगारांनी रवींद्र सावंत यांच्यासमोर वाचून दाखविताना कोरोना काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागात काम करूनही प्रशासनाला त्याची जाणिव नसल्याची खंत यावेळी कामगारांनी व्यक्त केली.कामगार नेते रवींद्र सावंत यांनी चर्चेतून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर प्रशासन दरबारी याला वाचा फोडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. रूग्णालयाची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची नवीन कमिटीही यावेळी तयार करण्यात आली. युनिट अध्यक्षपदी प्रमोद भेरे, कार्यकारी सदस्य म्हणून सुधीर पुत्रन, अनंत शिंदे, संजय चव्हाण,अश्विनी झाडराव, हेमांगी जोशी, प्रतिभा नाईक यांची निवड करण्यात आली. राजेंद्र सातपुते, कमल चव्हाण,विमल वाग पंजे,सुष्मराव यावेळी उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन सुहास म्हात्रे यांनी केले तर प्रमोद भेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.