संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
मुंबई : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा
केला जातो. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पहाटे ६.३० वाजता देशाला संबोधित
करणार आहेत. या वर्षाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ आहे. जी शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी
योग अभ्यास करण्यावर केंद्रीत आहे.
* योग कार्यक्रमात
२० लोकांना परवानगी
सोमवारी २१ जून रोजी आपण ७ वा योग दिवस साजरा करणार
आहोत. देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या योग कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी
होतील. पण कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेता एका ठिकाणी केवळ २० लोकांचा कार्यक्रमात सहभाग
असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या भाषणानंतर सकाळी योगा केला जाईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकंही व्हर्चुअल माध्यमातून या योग कार्यक्रमात हजेरी लावतील.
त्यानंतर अध्यात्मिक आणि योग गुरू लोकांना संबोधित करतील.
* २०१७ मध्ये योग
दिनाचा प्रस्ताव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.