संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेले कोव्हिड १९ लसीकरण शिबिर उत्साहात पार पडले. शंभराहून अधिक स्थानिक रहीवाशांना विभागातच लसीकरणाचा लाभ घेता आल्याने रहीवाशांनी आयोजक सुनिता देविदास हांडेपाटील व सुनिकेत देविदास हांडेपाटील यांचे आभार मानले.
कोपरखैराणे नोडमध्ये केवळ खैरणे नागरी आरोग्य केंद्रातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध असल्याने अन्य परिसरातील रहीवाशांना लसीकरणासाठी काटेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये महापालिकेने कोव्हिड १९ लसीकरण शिबिराचे आयोजन करावे यासाठी सुनिता देविदास हांडेपाटील व सुनिकेत देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्र्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. खैरणे नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला बारापात्रे यांच्या सहकार्यामुळेच या शिबिराचे आयोजन करणे शक्य झाले असल्याची माहिती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी दिली.
प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १७ मधील जय तुळजाभवानी सोसायटीमध्ये सकाळी ९ ते सांयकाळी ५ या वेळेत खैरणे नागरी आरोग्य केंद्र व भाजपच्या स्थानिक पदाधिकारी सुनिता देविदास हांडेपाटील यांच्या माध्यमातून या कोव्हिड १९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १२० स्थानिक रहीवाशांना या लसीकरणाचा लाभ घेता आला. प्र्रशासनाच्या सहकार्यामुळेच हे लसीकरण शिबिर राबविणे शक्य झाल्याचे सांगत सुनिता हांडेपाटील यांनी प्रभागातील रहीवाशांच्या वतीने डॉ. बारापात्रे यांचे आभार मानले.