Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील पदपथावर तसेच सिडको सोसायटींच्या अंर्तगत भागात ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊसही सुरू आहे. पाऊस सुरू झाल्यावर पदपथ लगेच निसरडे होतात व त्यावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरूष, लहान मुले घसरून पडतात. त्यांना जखमा होतात. अनेकदा हात-पाय फॅक्चर होण्याच्याही घटना घडतात. त्यामुळे प्रभागातील मुख्य तसेच अंर्तगत रस्त्यालगतच्या सर्वच पदपथावर पालिका प्रशासनाकडून महिन्यातून किमान दोन-तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करणे आवश्यक आहे. याशिवाय तीच समस्या प्रभागात असणाऱ्या सिडकोनिर्मित गृहनिर्माण सोसायट्यांचीही आहे. सोसायटी आवारातही महापालिकेने टाकलेल्या पेव्हर ब्लॉकवरही शेवाळ साचून रहीवाशी त्यावरून चालताना पडतात. सिडको सदनिकाधारकही नवी मुंबईचे मालमत्ता करधारक आहेत. महापालिकेने कंडोनिअम अंर्तगत जलवाहिन्या व मल:निस्सारण वाहिन्या मोफत बदली करून दिलेल्या आहेत. त्यामुळे पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करताना प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही पालिका प्रशासनाने ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी. पावसाळा अजून साडे तीन महिने राहणार असल्याने पालिका प्रशासनाने पदपथ व गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात महिन्यातून किमान दोन-तीन वेळा ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.