Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
शिवसेना, कॉंग्रेस, भाजप, मनसे मागणी सर्वाची, महासभेतही ठराव संमत
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील श्रमिकांची वस्ती असलेल्या एलआयजीमधील रहीवाशांनी आजवर मल:निस्सारण केंद्राची दुर्गंधी सहन केली. तथापि आता त्या ठिकाणी क्रिडा संकुल व्हावे यासाठी शिवसेना नगरसेवकासह कॉंग्रेस, भाजप व मनसेही प्रयत्न करत असल्याने स्थानिक रहीवाशांना लवकरच त्या जागेवर क्रिडासंकुल बनून स्थानिकांना लाभ मिळेल असा आशावाद स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर २ येथील एलआयजीमधील रहीवाशांनी गेली अनेक वर्षे मल:निस्सारण केंद्राच्या दुर्गंधीचा सामना केलेला आहे. हे मल:निस्सारण केंद्र सानपाडा पामबीच परिसरात स्थंलातरीत झाल्याने येथील रहीवाशांची खऱ्या अर्थाने मुक्तता झालेली आहे. त्या परिसरात श्रेयवादावरून काही घटकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू असून हा वाद वारूळापर्यतही जावून पोहोचला आहे.
या प्रभागात शिवसेनेचे रंगनाथ आवटी नगरसेवक होण्यापूर्वी सन २००३ पासून कॉंग्रेसच्या रवींद्र सावंत यांनी हे मल:निस्सारण केंद्र हटवून त्याजागी क्रिडासंकुल उभारण्याची मागणी केली आहे. त्यांच्या कार्यालयात त्यांचा पत्रव्यवहार व फोटो व वर्तमानपत्राचीही कात्रणेही आहे. मागील काही काळात भाजपच्या सौ. सुहासिनी नायडू आणि मनसेचे अभिजित देसाई यांनीही मल:निस्सारण केंद्राच्या जागी क्रिडा संकुल व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहेत.
शिवसेनेचे नगरसेवक रंगनाथ आवटी यांनी महासभेत चार वर्षापूर्वी (२०१७) मल:निस्सारण केंद्राच्या जागी क्रिडासंकुल असावे ही मागणी करत ठरावही मंजुर करून घेतला आहे. राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्येही पालिका प्रशासनाने रंगनाथ आवटी यांच्या मागणीनुसार मल:निस्सारण केंद्राच्या जागेवर क्रिडा संकुल असा बदलही मंजुरीसाठी पाठविला आहे.
मल:निसारण केंद्रावरील राजकीय कलगीतुऱ्याने स्थानिकांचे काही काळापासून मनोरंजन होत असले तरी गेल्या १५ वर्षापासून या विषयावर महापालिकेकडे पाठपुरावा होत असल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सर्वानी प्रयत्न करा व क्रिडासंकुल सुरू करा असा सूर आता स्थानिक रहीवाशांकडून आळविला जात आहे.