Navimumbailive.com@gmail.com :- ८३६९९२४६४६
नवी मुंबई : वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वर्ग वडाच्या झाडाला फेऱ्या माऱत आपल्याला पुढील सात जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून देवाकडे मनोकामना करत असताना भाजपच्या माजी नगरसेविकेसह अन्य महिलांनी वृक्षारोपण करत स्वत:च्या नवऱ्याइतकीच पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी नेरूळ नोडमधील महिला आपल्या गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या वडाच्या झाडाची पुजा करण्यात व्यस्त असताना भाजपच्या प्रभाग ९६ मधील माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत या आपल्या घरातील महिलांसह नेरूळ सेक्टर २४ येथील बामणदेव-झोटिंगदेव मैदानावर वृक्षारोपण करताना व्यस्त असलेल्या पहावयास मिळाल्या. सौ. रूपाली किस्मत भगत यांच्यासह सौ. दर्शना प्रतिक म्हात्रे, सौ.उषा रविंद्र भगत, सौ. नमिता नंदेश भगत, सौ. कविता सोमनाथ भगत, सौ. रसिका संदीप कुमार, सौ. प्रमिला दिंगबर गिरी, सौ. दर्शना विनित गिरी यांनी मैदानावर वृक्षारोपण केले. सध्या संपुष्ठात येत असलेली वनसंपदा नजीकच्या काळात पर्यावरणाच्या समतोलावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार असल्याने आम्ही आज वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी दिली.