Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे रस्त्यावरील गरीबांपर्यत श्रीमतांपर्यत सर्वाचेच अर्थकारण डबघाईला आले आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे वाहनांचाही व्यवसाय मंदावलाच नाही तर थंडावला असल्याने त्यांना आता कर्ज फेडणे अवघड होवून बसले. जनजीवन सुरळीत झाल्याशिवाय प्रवासी तसेच अन्य वाहतुक शक्य नसल्याने वाहन चालक-मालकांना कर्ज फेडण्यासाठी डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबईचे अध्यक्ष दिलीप किसनराव आमले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईसह महाराष्ट्रतील लाखो ऑटो रिक्षा, टँक्सी, विद्यार्थी वाहतूक , स्कुल व्हॅन चालक मालकांना जगणे अवघड झालेले असताना हफ्ते भरण शक्य होणार नाही. त्यामुळे बँक, पतपेढी, फायनान्स कंपनीच्या हप्ते भरण्यासह परिवहन विभागाशी संबंधित कागदोपत्री नोंद आहे अशा वाहन चालकांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत शासनाने मुदत वाढ द्यावी अशी मागणी दिलीप आमले यांनी करताना लॉकडाऊन व कोरोना महामारीमुळे वाहतुक व्यवसायावर आलेले संकट राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३० जुलैपर्यंत परिवहन विभागाशी संबंधित कागदोपत्री सवलत प्रदान केल्यावरही परिवहनाच्या वाहन आणि सारथी या कंपनीद्वारे संगणक प्रणाली मध्ये सुधारणा न केल्याने विलंब शुल्क आकारले जावू लागले आहे ही बाब लक्षात घेता व कोरोना महामारीत केलेल्या लॉक डाऊनमुळे मागील वर्षापासून ऑटो रिक्षा, टँक्सी, स्कुल व्हॅन चालक मालकांचा व्यवसाय बंद असल्याने बॅंक व फायनान्स कंपनीचे हप्ते थकले आहे, ते भरण्यासाठी तगादा लावून गुंडगिरी पध्दतीने हप्ते वसूली केली जात आहे, यामुळे चालक मालक त्रस्त झाले आहे, आर्थिक परिस्थिति पाहता बँक, फायनान्स कंपनीचे हप्ते भरण्यासाठी तसेच परिवहनशी सबधित विलंब शुल्क रद्द करून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ही मुदत वाढ करण्याची मागणी दिलीप आमले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.